उस्‍मानाबाद - नुकत्‍याच लातूर येथे झालेल्‍या विभागीय कराटे स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍या स्‍पर्धेमध्‍ये कुडो असोसिएशन उस्‍मानाबादच्‍या वतीने आपसिंगा व कामठा ता. तुळजापूर येथील विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला होता. यामध्‍ये या विद्यार्थ्‍यांना गोल्‍ड मेडल व एका विद्यार्थ्‍याला सिल्‍वर असे एकुण चार मेडल मिळालेले आहेत. यामध्‍ये गुजाल्‍ला अल्‍लाऊद्दीन फकीर व प्रियंका सुरेश रोकडे यांना गोल्‍ड मेडल हे दोन्‍ही नरेंद्र आर्य विद्यालय, आपसिंगा येथील विद्यार्थी आहेत. तर विजय काशिनाथ रोकडे याला गोल्‍ड मेडल हे कै. साहेबराव हंगरगेकर महाविद्यालय तुळजापूर येथील विद्यार्थी आहेत. तर शंभूनाना काशिनाथ रोकडे यास सिल्‍वर मेडल मिळाले आहे. तो छत्रपती शिवाजी ज्‍यु सायन्‍स कॉलेज उस्‍मानाबादचा विद्यार्थी आहे. व या सर्व विद्यार्थ्‍यांची राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धेसाठी निवड झालेली  आहे. यशस्‍वी   विद्यार्थ्‍याचे सर्वत्र आभिनंदन होत आहे. प्रशिक्षक तथा कुडो असोसिएशनचे जिल्‍हाध्‍यक्ष इब्राहिम (मास्‍टर) शेख यांचे या विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन लाभले. 
 
Top