तुळजापूर  -  मतदान करणे हे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आणि हक्क आहे. हा हक्क प्रत्येकाने निर्भयपणे बजावला  पाहिजे. भारतीय घटनेने मतदारांना मतदान करण्याचा अमुल्य अधिकार दिला आहे. तेव्हा प्रत्येकानी मतदानाचे महत्व लक्षात घेवून सर्वांनी विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
           तुळजापूर येथील नवोदय विदयालयात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती   अभियानानिमीत्त मतदार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ डॉ. नारनवरे यांनी हिरवी झेंडी दाखवनू प्रारंभ केला.
            जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, उमेदवार निवडण्याचा माझा अधिकार नसून ती  माझी राष्टरीय जबाबदारी आहे. विधानसभा मतदार  संघात मतदारात मतदानाविषयी जनजागृती करावी व  निर्भयपणे व कोणाच्या ही दबावास व अमिशाला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा असे आवाहन केले.
           यावेळी  नवोदय विदयालयातील प्राचार्य,‍ प्राध्यापक, शिक्षक, विदयार्थ्यांना मतदान करण्या  विषयी शपथ दिली. त्यानंतर ‍ जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत   नारनवरे यांच्यासह विदयालयातील्‍ ‍शिक्षक, विदयार्थ्यानी विदयालय ‍परीसर स्वच्छता केली.    
 
Top