नळदुर्ग - ३० सप्टेंबर १९९३ ला झालेल्या महाप्रलयकारी भुकंपात लोक मृत्यूमुखी पडले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. हजारो मुले, मुली अनाथ झाले. यांना आधार देण्यासासाठी शासनाबरोबर अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. सर्वांनीच या लोकांना या धक्यातून सावरण्यासाठी मदत केली. या भुकंपात अनाथ झालेल्या मुलांसाठी शाळा, विद्यालय . या शाळेमध्ये शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे करुन पदवी संपादन केली. परंतू पदवी घेतल्यानंतर पुढे काय करायचे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अशा अनाथांना याकाळी ख-या आधार देण्याची गरज आहे.
आज भुकंप होवून २१ वर्ष पुर्ण झाली आहेत. भुकंपात निराधार झालेल्या या मुलांना समाजात स्वाभिमानाने उभे राहण्याकरिता त्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. कारण आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलांना चांगले काय, वाईट काय याचे भान नसल्यामुळे त्यांना योग्यवेळी त्यांच्या कर्तव्याची जाणीव होणे हिताचे ठरते. समाजातील पैसेवाल्याने अशा मुलांना पुढील शिक्षणासाठी लागणारा पैसा देवून त्यांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी लावावा. कारण अनेक विद्यार्थी पैशा अभावी उच्च शिक्षण न घेता आहे त्याच ठिकाणी राहत आहेत. किंवा मोठ्या शहरात पाच, दहा हजाराची नौकरी करण्याचा प्रयत्न करत परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्यावर आलेले नैसर्गीक संकट दूर सारु. विद्यार्थी मोठ्या हिमंतीने गुणवत्ताधारक झाले. परंतू पुढे आपले कसे होणार आपणाला कोण आधार देणार? या विवंचनेत आहेत. कारण आज समाजातील माणुसकीलाच पावत चालली आहे. माणुस स्वार्थी बनला आहे. इतरांचे चांगले व्हावे हा विसर त्याला पडला आहे. प्रत्येकजण एकमेंकांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आपले घर, संसार, आपली मुले-बाळे त्यात तो गुरफटत चालला आहे. त्यामुळे समाजाचे आपण काय देणे लागतो. याचा तो विचारच करीत नाही. समाजात अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. त्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. त्यांनी याबाबतीत लक्ष घालणे म्हणजे शासनाच्या अनेक योजना कल्याणकारी आहेत. परंतू त्या अनाथांचे कल्याण करण्यासाठी स्वत:चे कल्याण करुन घेण्यातच त्या खात्याचे अधिकारी धन्यता मानतात. त्यामुळे त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही. निराधार, अनाथ मुलांना जर याचा फायदा झाला तर २१ वर्षापुर्वी निसर्गाने त्यांना दिलेला धक्का ते विसरुन जातील. एका अर्थाने धावत्या युगात ते समर्थपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतील.
मोठ-मोठ्या लाखोची देणगी देणा-या लोकांनी अशा निराधारांना आर्थिक हातभार लावल्यास देणगी दिलेल्या रक्कमेच्या चौपट पुण्य त्यांच्या पदरी पडेल हे निश्चित. भुकंप झालेल्या मुलांना पदवीनंतर मिळणारे शिक्षण व स्वतंत्र राहण्याची मुभा हिच त्यांच्या आयुष्याची खरी सुरुवात आहे. कारण आतापर्यंत त्यांच्या आवडी-निवडीचा विचाराने आयुष गेले आहे. मात्र २१ वर्षानंतर ही त्यांना स्वतंत्र होता येईल का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
 
Top