उस्मानाबाद :- वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे 30 सप्टेंबर 2014 रोजी  दोन वेगवेगळया शोभेच्या दारु करण्याच्या कारखान्यावर अचानक वीज पडून झालेल्या स्फोटात दहा व्यक्ती मृत्यमुखी पडले. याबाबत दंडाधिकारीय चौकशी अधिकारी  म्हणून विभागीय अधिकारी, कळंब यांची नेमणूक करण्यात आली आहे.
    सदर घटनेत मयत तसेच जखमी व्यक्तीचे नातेवाईक, महसूल प्रशासानाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व सदर दुर्घटना घडलेल्या शोभेच्या दारु करण्याच्या कारखान्याचे मालकानी चौकशी कामी व जवाब देण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, कळंब येथे संबंधितांनी दुपारी 12 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान लेखी जवाबासह तसेच तोंडी जवाबासाठी उपस्थित रहावे.
सदर चौकशीच्यावेळी घटनेबाबत माहिती असणारे व आवश्यक व महत्वाची माहिती  सांगू  इच्छिणारे नागरीकही उपस्थित राहू शकतील.
    दि. 29 रोजी सर्व मयत व जखमी झालेल्या लोकांचे रक्त संबंधातील व इतर नातेवाईक, सदर दुर्घटना घडलेल्या शोभेच्या दारु करण्याच्या कारखान्याचे मालक यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
    तसेच 30 ऑक्टोंबरला तहसीलदार वाशी, संबंधित मंडळ अधिकारी, संबंधित तलाठी,  संबंधित पोलीस पाटील, संबधित ग्रामसेवक, संबधित सरपंच व उपसरपंच व संबधित सर्व पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी उपस्थित राहून जवाब नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, कळंब यांनी एका  प्रसिध्दीपत्रकाव्दरे केले आहे.
 
Top