उस्मानाबाद - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2014 साठी जिल्ह्याच्या चारही मतदारसंघात दि. 15 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यादिवशी मतदान प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने या दिवशी जिल्ह्यात होणारे आठवडी बाजार पुढे ढकलण्याचे निर्देश निवडणूक यंत्रणेने दिले आहेत. यासंदर्भात सर्व कृषी उत्पन्न्  बाजार समित्यांच्या सचिवांना कळविण्यात आले असून त्याप्रमाणे अनुपालन करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
240- उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील 301 मतदान केंद्रांवर  मतदान प्रकिया होणार आहे. त्या अनुशंगाने उमरगा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही उमरगा आणि मुरुम येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांना दिले आहेत.  
 
Top