मुंबई - राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, शासकीय यंत्रणा आणि सामान्यजनता यासारख्या विविध समाजघटकांच्या सहभागातून महाराष्ट्र राज्य स्वच्छ आणि सुंदर बनवूया, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज राजभवन येथे केले. केंद्र शासनाने सुरु केलेल्या‘स्वच्छ भारत अभियानात’सहभागीहोऊनआपण सर्वांनी या मोहिमेला गती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       राज्यपालांच्या हस्ते आज मंत्रालय आणि राजभवन येथे स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर त्यांनी राजभवन येथेउपस्थित पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राजभवन येथे झालेल्या स्वच्छता मोहीम प्रसंगी राज्यपालांच्या पत्नी श्रीमती विनोदाराव, राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमल सिंग यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रात राबवावयाच्या स्वच्छ भारत अभियानासाठी आपल्या विनंतीवरुन राज्यातील 9 नामवंतांनी ‘स्वच्छतादूत’ म्हणून काम करण्यास तयारी दर्शविली असून त्यात आप्पासाहेब धर्माधिकारी, अभिषेक बच्चन, राजश्री बिर्ला, निता अंबानी, अंजली भागवत, मोनिका मोरे, सुनिधी चौहान, मकरंद अनासपुरे आणि तुषार गांधी यांचा समावेश असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राज्यपाल म्हणाले की, स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार केंद्र शासनामार्फत देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून यादृष्टीने व्यापक प्रयत्न करण्यात आले आहेत. यापुढील काळातही याअभियानाचीव्याप्ती वाढवून संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करु, असे ते म्हणाले.
राज्यपाल म्हणाले की, जिथे तातडीने स्वच्छतेची गरज आहे, अशा ठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्याची सूचना आपण संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त आदींबरोबर बैठक घेऊन तसेच राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींबरोबर व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा करुन या मोहिमेला गती देण्याचे आवाहन राज्यपालांनीसंबंधितांनाकेले. विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माणसंस्थायासारख्या विविध घटकांनीएकत्रयेऊन हे अभियान यशस्वीकरावे.  या मोहिमेत लहान मुलांचा सहभाग घेण्याचेही आवाहन त्यांनीकेले. स्वच्छ भारत अभियानाविषयी लहान मुलांमध्ये जाणीवजागृती करण्यासाठी आराखडा बनविण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना सांगण्यात आले असल्याचेही राज्यपाल श्री. राव यांनी यावेळी सांगितले.
राज्यपाल म्हणाले, अस्वच्छतेमुळे डायरीया, मलेरीया आदीआजार उद्‌भवतात. विशेषत: लहान मुलांना याची लगेच लागण होते. त्यामुळे या आजारांचाप्रददुर्भावहोऊनयेम्हणूनकोणत्याही परिस्थितीत आपला परिसर स्वच्छ ठेवावा लागेल. शौचालयाअभावी महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला तसेच प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. स्वच्छता ही एक निरंतन प्रक्रिया आहे. महाराष्ट्रात सर्वांच्या सहभागातून स्वच्छ भारत अभियान राबवून आपण महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ राज्य बनवू, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 
 
Top