तुळजापूर :- तुळजापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०१४ साठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर झालेल्या निरंतर पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत १३ हजार ७२३ मतदारांची नव्याने नोंद झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी बी.एस.घुगे यांनी दिली.यात तुळजापूर तालु्क्‍यायामध्ये ३ हजार १९५ पुरूष,३ हजार ५१४ स्त्रीया असे एकुण ६ हजार ६९५ नवीन मतदारांची नोंदणी तर उस्‍मानाबाद तालु्क्‍यायामध्ये ३ हजार ४२३ पुरूष तर ३ हजार ५८४ स्त्रिया असे एकूण ७ हजार ०७ मतदारांची नोंदणी झाली आहे. यात तुळजापूर तालु्क्‍यात लोकसभेसाठी २ लाख ५१० व इतर ७ तर धाराशिव तालु्नयात १ लाख १५ हजार ९४४ इत्नया मतदारांचा समावेश होता. तर विधानसभेसाठी तुळजापूर तालु्क्‍यायात १ लाख ११ हजार ६६८ पुरूष तर ९५ हजार ५३० स्त्रिया व इतर ७ मतदार असे एकूण २ लाख ७ हजार २०५ मतदारांचा समावेश आहे.
उस्‍मानाबाद तालु्क्‍यातील ६६ हजार ८४७ पुरूष ५६ हजार १०४ स्त्रिया असे एकूण १ लाख २२ हजार ९५१ मतदारांचा समावेश असून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३७० मतदान केंद्रावर एकूण ३ लाख ३० हजार १५६ मतदार मतदानाचा ह्नक बजावणार आहेत. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार के.एच.पाटील,मिडिया कक्ष प्रमुख प्रा.व्ही.आर.कागदे, विविध विभागाचे निवडणुक कक्ष प्रमुख, निवडणुक कर्मचारी उपस्थित होते.

 
Top