उस्मानाबाद - स्वच्छ भारत अभियान उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय व तहसील कार्यालय, भूमी अभिलेख आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी या मोहीमेत
शनिवारी सकाळीच अधिकारी व कर्मचारी यांनी मोहिमेस सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालय इमारती मागचा परिसर, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी बी. एस. घुगे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, शिल्पा करमरकर, तहसीलदार सुभाष काकडे, राजश्री मोरे, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे कर्मचारी सहभागी झाले होते. नगरपरिषद यंत्रणेनेही त्यांना सहकार्य केले.
सर्व परिसर नेहमीच स्वच्छ राहील, याची दक्षत घेण्याचे निर्देश डॉ. नारनवरे यांनी संबंधितांना दिले. स्वता जिल्हाधिकारी यांनीच या मोहिमेत सहभाग घेतल्याने सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. 
प्रत्येक शासकीय कार्यालयांनी स्वच्छता मोहीम राबवावी, कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.  
सहभागी झाले होते.
 
Top