उस्‍मानाबाद - उस्‍मानाबाद जिल्‍हा पोलिस दलाच्‍या वतीने पोलिस कल्‍याण निधी अंतर्गत अधिकारी / कर्मचारी व त्‍यांच्‍या कुटुंबियांच्‍या कल्‍याणाकरिता त्‍यांच्‍या लहान मुलांच्‍या संगोपनासाठी पोलिस मुख्‍यालश्‍ उस्‍मानाबाद येथील लिटल स्‍टार प्राथमिक शाळा येथे पाळणाघर चालु करण्‍यात आलेले आहे. याचा पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना त्‍याचा लाभ होईल. विशेषत: महिला पोलिस कर्मचा-यांना त्‍यांची कर्तव्ये बजावतांना पाल्‍यांचा संगोपनाही कोणत्‍याही गंभीर अडचण निर्माण होणार नाही तसेच कायदा सुव्‍यवस्‍थेच्‍या प्रसंगी त्‍या कर्तव्‍यावर तात्‍काळ उपलब्‍ध हाऊ शकतील. सदरील पाळणाघर हे सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीसाठी चालु राहणार आहे.
  या पाळणाघरचे उदघाटन दि. 8 नोहेंबर रोजी सकाळी 11 वाजता सौ. श्‍वेता अभिषेक त्रिमुखे यांच्‍या शुभ हस्‍ते फित कापून करण्‍यात आले. यावेळी मा. अभिषेक त्रिमुखे, पोलीस अधिक्षक उस्‍मानाबाद, बाळकृष्‍ण भांगे, अपर पोलिस अधिक्षक उस्‍मानाबाद, नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी उस्‍मानाबाद, एस.आर घाडगे, पांलीस निरीक्षक कल्‍याण, एम.डी. गुंडीले, पोलीस निरीक्षक स्‍थागुशा, संभाजी पाटील, नियंत्रण कक्ष डंबाळे, नेवासे, पोलिस निरीक्षक जिवीशा, श्रीमती अस्मिता वाघमारे, वैद्यकीय अधिकारी, पोलिस रूगणालय उस्‍मानाबाद दिपक भांगे, मुख्‍यध्‍यापक लिटल स्‍टार प्रा‍थमिक शाळा उस्‍मानाबाद व शिक्षक तसेच पोलिस मुख्‍यालय उस्‍मानाबाद येथील पोलिस अधीकारी, कर्मचारी मोठया संख्‍येने‍ उपस्थित होते,
सदरील कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी श्रीमती कदम सहाय्यक पोलिस निरीक्षक सायबर सेल, महिला सपोफौ/ श्रीमती माया दामोदरे,. मपोकॉ, शिल्‍पा साठे, सुवर्णा कानडे, सिधीकी महिला सहायक कक्ष उस्‍मानाबाद यांनी चांगली कामगिरी केलेली आहे.   
 
Top