उस्मानाबाद -: सध्या जिल्ह्यात तुर, हरभरा या पीकाची  किडरोग नियंत्रण व सल्ला प्रकल्पांतर्गत केलेल्या निरीक्षणावरुन तूर पिकावर काही ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांनी या कीडीच्या नियंत्रणासाठी पुढील उपाय योजना करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळयाच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के 0.2 ग्रॅम किंवा असाफेट 75  टक्के 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावी  व मोठ्या अळया हाताने वेचून नष्ट कराव्यात.
    हरभरा पेरणी करतेवळी रायझोबियम व पीएसबी प्रत्‍येकी 250 ग्रॉम आणि ट्रायकोडर्मा 40 ग्रॅम प्रती 10 किलो बियाणे बीज  प्रक्रिया करुन शेतकऱ्यांनी या अळीचा नियंत्रण करण्याचा सल्ला  कृषि अधिका-यांनी नी दिला आहे.
 
Top