उस्मानाबाद -:  एनजीओनी  बँकांच्या माध्यमातून  जे एल जीचे मोठ्या प्रमाणात  गट तयार करुन बँकानी शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सतत कार्यशील राहून  भुमीहीन शेतमजूरांना स्वालंबी बनवावे, असे आवाहन नाबर्डचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे यांनी केले. उस्मानाबाद येथे राष्ट्रीय कृषी  व ग्रामीण विकास बँक नाबार्ड उस्मानाबादच्यावतीने   जे. एल. जी संयुक्त दायीत्व गट विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी देशपांडे बोलत होते.
           कार्यशाळेत मार्गदर्शन करताना देशपांडे म्हणाले की,  यांनी जे एल जी/ संयुक्त दायीत्व गटासंदर्भात म्हणाले की,  देशात भूमिहीन शेतकऱ्यांना सातत्यपुर्ण कर्जपुरवठा व्हावा, यासाठी  देशभरात 5 लाख  भुमिहीन शेतकऱ्यांचे संयुक्त दायीत्व गट तयार करुन बँकाव्दारे गटाना अर्थसहाय्य व्हावे, अशी  केंद्र शासनाची मुख्य भुमिका असल्याचे स्पष्ट  केले. 
        लिड बँकेचे अधिकारी भीमराव दुपारगुडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी रिझर्व बँकेचे सहायक महाप्रबंधक श्री. सांगवीकर जिल्हा प्रकल्प अधिकारी (एनआरएलएम) डॉ. केशव सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक संस्थेचे पांडुरंग घोडके  उपस्थित होते.  
 
Top