नळदुर्ग  चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथे इंदिरा आवास योजनेचे चोवीस घरकुल मंजूर झाले असून लाभार्थ्‍यांना डब्‍बल घरकुले मंजूर झाल्‍याचे नमूद करुन मोठा गैरप्रकार झाल्‍याचे आरोप अखिल भारतीय विरोधी सामाजिक न्‍याय मंचचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष बापूराव गायकवाड यांनी केले आहे.
निवेदनात म्‍हटले आहे की, इंदिरा आवास योजनेचे चिकुंद्रा गावात चोवीस घरकुले लाभधारकाना मंजूर झाले आहेत. त्‍यात बारा घरकुले डब्‍बल मंजुर झाली आहेत. तरी सदरची यादी ग्रामपंचायत चिकुंद्रा सरपंचानी जाणुनबुजून खोटी माहिती देवून तसा ठरावा देवून शासनाची फसवणूक केली आहे. तरी सरपंचाविरुध्‍द गुन्‍हा दाखल करुन व चौकशी पूर्ण झाल्‍याशिवाय सदरचे चोवीस घरकुले वाटप करु नये, सदरचे घरकुले वाटप केल्‍यास आम्‍ही मागासवर्गीय आंदोलन केल्‍याशिवाय राहणार नाही. बाकीचा गरीब समाज घरकुल्‍यापासून वंचित राहिला आहे. सदरचे घरकुले वाटप करु नये, अशी मागणी करण्‍यात आली आहे. रमाई आवास योजनेची घरकुले पूर्वी मिळालेले आहेत. तसेच इंदिरा योजनेचे घरकुले अगोदर मिळाली आहेत. याप्रकरणी चौकशी करावी, असे अखिल भारतीय भ्रष्‍टाचार विरोधी सामाजिक न्‍याय मंचचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष बापूराव सोपान गायकवाड यांनी लेखी तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्‍याकडे केली आहे. याची एक प्रत जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना देण्‍यात आले आहे. या निवेदनावर विलास गायकवाड, शंकर गायकवाड, व्‍यंकट गायकवाड, मल्‍हारी गायकवाड, गीता सुभाष वाघमारे, मंकाबाई राजेंद्र कांबळे यांच्‍यासह वीस ग्रामस्‍थांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.
 
Top