
अकलूज पोलीस स्टेशनला भोसले यांचे भाऊ राजू मधुकर भोसले यांनी तक्रार दाखल केली असून यात संशयित म्हणून राहूलचा चुलतभाऊ पंट्या (प्रवीण) भोसले याचे घराचे वादावरुन वैमनस्य होते व त्यानेच घात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, अशी माहिती पो.नि. विश्वास साळुंखे यांनी दिली. राहूल भोसले यांच्या पश्चात पाठीमागे पत्नी, १ मुलगा, आई-वडील आहेत.राहूलचे हत्तेनंतर त्वरित अकलूज बंद झाले. खुनाची चर्चा भाऊ बंदकीतून झाली की राजकीय वैमन्यसातून झाली. याबाबत चर्चा चालू होती. मयताचे पोस्टमार्टेम केल्यानंतर नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले.