बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) येथील आनंदयात्री प्रतिष्ठानच्या वतीने आमदार दिलीप सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२५ ते २८ डिसेंबर दरम्यान बार्शीतील स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे राज्यस्तरीय आनंदयात्री एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.     
     बार्शीतील आनंदयात्री राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे हे तीसरे वर्ष असून या स्पर्धेकरिता राज्यातील सर्वाधिक बक्षीसांची एकांकिका तसेच सतत चार दिवस सुरु असणारी स्पर्धा आहे. स्पर्धेकरिता राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील बक्षीसपात्र नाट्यसंस्थांना प्रवेशिका देण्यात येणार अ सल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश अक्कलकोटे यांनी सांगीतले. विजेत्यांना बक्षीसे पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक ६१ हजार, द्वितीय ४१ हजार, तृतीय २१ हजार, उत्तेजनार्थ ११ हजार, याव्यतिरिक्त वैयक्तिक बक्षीसांत उत्कृष्ठ अभिनय स्त्री, पुरुष, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, रंग व वेशभूषा, उत्कृष्ठ संहिता यासाठी प्रत्येकी प्रथम ३ हजार, द्वितीय २ हजार, तृतीय १ हजार, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र अशी एकूण ४० बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभाग घेणार्‍या संघाकडून ३ हजार रुपये प्रवेशिका घेण्यात येणार आहे. सादरीकरणाच्या दिवशी संघाच्या भोजन व निवासाची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागासाठी मागील ३ वर्षांपासून संघाने घेतलेल्या पारितोषिकांच्या माहितीसह दि.५ डिसेंबर पर्यंत  या ईमेलवर विहीत नमुन्यात प्रवेशिका भरुन पाठवण्यात याव्या. प्रवेशिकेचा नमुना आनंदयात्री प्रतिष्ठान या फेसबुकच्या अकाऊंटवर उपलब्ध करण्यात आला आहे.
    स्पर्धा यशस्वीतेसाठी नागेश अक्कलकोटे , रामचंद्र इकारे , प्रताप दराडे , नगरसेवक अंबादास शिंदे, कृष्णा उपळकर, रुपेश बंगाळे, मकसुद मुल्ला, हर्षद लोहार,उदय कुलकर्णी, प्रशांत खराडे, बाबा माळगे, गणेश अक्कलकोटे, संजय कचरे, पंकज शिंदे, जमीर कुरेशी, दिपक कंगळे, संतोष घुमरे, विवेक गजशिव, वसिम शेख, संग्राम माने आदी प्रयत्‍नशिल आहेत.
 
Top