उस्मानाबाद - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच उस्मानाबाद येथील बालसुधारगृहात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बालकांना खाजिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी पंडितजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन उपजिल्हाधिकारी बी. एस. घुगे, उपजिल्हाधिकारी बी. एस. चाकूरकर, उस्मानाबाद, कळंब, भूम आणि उमरगा येथील उपविभागीय अधिकारी सर्वश्री अभिमन्यू बोधवड, सचिन बारवकर, संतोष राऊत आणि रवींद्र गुरव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार सुभाष काकडे, राजश्री मोरे, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.