पांगरी -: पांगरी ता.बार्शी परिसरातील तीस गावांच्या सोयीसाठी बँक ऑफ इंडिया तर्फे पांगरी येथे सुरू केलेली ए.टी.एम.सेवा गत पंधरा दिवसापासून बंद असल्यामुळे येथील हजारो ग्राहकांना ही सेवा असून अडचण नसून खोळंबा अशा स्वरूपाची ठरत आहे. ए.टी.एम.सेवेच्या संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन पांगरीतील सेवा कार्यान्वित करून ग्राहकांची सोय करून द्यावी अशी पांगरी भागातील अनेक गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी तालुक्यात महत्वाचे गांव अशी ओळख असलेल्या  व  पुणे-लातूर राज्यामार्गावरील सर्व सोई युक्त गाव असलेल्या पांगरी येथे दै.पुढारीच्या पाठपुराव्यामुळे कांही महिन्यांपूर्वी ए.टी.एम.सेवा सुरू झाली आहे.मात्र गत अनेक दिवसापासून पांगरी येथील ए.टी.एम.सेवा सतत खंडित होत आहे.त्यात कळस म्हणजे अलीकडील पंधरा दिवसात ही सेवाच ग्राहकांना मिळणे दुरापास्त झाले आहे.पांगरी पासून वीस की.मी. अंतरावर ही सेवा उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना बँक वेळेव्यतिरिक्त आर्थिक भुरदंड सहन करून येडशी,अथवा बार्शी या शहराकडे जावे लागत आहे.
   तरी संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन येथील ए.टी.एम.सेवा तात्काळ सुरू करावी अशी पांगरी परिसरातील ग्राहकांची मागणी आहे.
 
Top