उस्मानाबाद - आंबा बागायतदार शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की, उत्पादीत आंबा युरोपीयन देशांना निर्यात करणे किंवा देशांतर्गत चांगल्या दराने विक्री करण्यासाठी आंब्यामधील कीडनाशके उर्वरित अंश व किडरोगाची तपासणी करुन घेण्यासाठी आपल्या बागेची नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाकडे करुन  प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार  यांनी केले आहे.
युरोपीय देशास आंबा निर्यात करणे किंवा विक्री करण्यासाठी सदरील प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. नोंदणीसाठी आवश्यक असलेले अर्ज व चलनाचे शिर्ष संबधित तालुका कृषि अधिकारी/ मंडळ कृषि अधिकारी यांचेकडे उपलब्ध असून अर्जासोबत संबंधित जागेचा 7/12 व स्थळदर्शक नकाशा व रुपये 50 फी चलनाद्वारे भरुन  नोंदणी 15 जानेवारी, 2015 पर्यत करुन प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   
 
Top