वैराग ( महेश पन्‍हाळे ) सोशल मिडीयाच्या जमान्यात तरून पिढी टेलिव्हिजन ,संगणक व मोबाईल यात गुरफडत असताना उस्मानाबाद येथील ओंकार नायगावकर या तरुणाने छत्रपती शिवाजीमहाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन एकट्याने सायकल वरून शिवतीर्थ रायगड वारीचा संकल्प केला व तो नुकताच पूर्ण सुध्दा केला.
       आजच्या काळातील तरून पिढी टेलिव्हिजन पाहण्यात वेळ वाया घालवत असताना दिसते तर तासान तास संगणकावर गेम खेळण्यात धन्यता मानते आणि मोबाईलच्या माध्यमातून फेसबुक ,इंटरनेट , व्हॉट्सअॅपचा वापर करताना दिसून येते .ज्याचे मन आणि मनगट मजबूत असते त्याला जीवनात काहीच कमी पडत नाही असे म्हणतात म्हणून दररोजच्या जीवनात सायकलचा वापर केल्यास प्रकृती उत्तम राहील .एकीकडे वाहनांची वाढती संख्या त्यात वृक्षांची बेसुमार तोड यामुळे मानवी जीवनात प्रदूषणाचा विळखा वाढत असताना सायकलचा वापर केल्यामुळे प्रदूषण टळेल ,आरोग्य उत्तम राहील व निसर्गाची काही प्रमाणात हानी टळेल  असाही संदेश या तरुणाने दिला आहे .
      छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवविचार व प्रसार व प्रचार या ध्येयाने प्रेरित होवून ओंकार नायगावकर हा तरुण २६ नोव्हेंबर रोजी पहाटे उस्मानाबाद येथून सायकलवरून दुर्गराज रायगडाच्या भेटीला निघाला शरीर साथ देईल का नाही याची खात्री खुद्द ओंकारलाही नव्हती .पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ओंकारने पहिल्या दिवशी बार्शी कुर्डूवाडी मार्गे १०५ किलोमीटर अंतर पार करून टेंभूर्णी येथे मुक्काम केला .दुसऱ्या दिवशी इंदापूर बारामती पुढे १०० किलोमीटरचा प्रवास करून दुसरा मुक्काम केला .तिसऱ्या दिवशी जवळपास पुन्हा १०० किलोमीटरचा प्रवास करून कापूरहोळ येथे मुक्काम केला आणि चौथ्या दिवशी तो महाड मुक्कामी पोहोचला जवळपास ४२५ किलोमीटरचे अंतर पार करून पाचव्या दिवशी प्रत्यक्ष रायगडाच्या पायथ्याशी पोहोचला .गडाची वाट बिकट असल्याने पायथ्यापासून रायगड किल्ल्यापर्यंत त्याने सायकल उचलून वर नेहली .आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले .संपूर्ण प्रवासात त्याच्या बरोबर फक्त छत्रपती शिवाजी महराजांचा शिक्का असलेले पेंडल होते .सव्वाचारशे किलोमीटरच्या प्रवासात ज्या ज्या ठिकाणी शाळा असतील त्या त्या ठिकाणी ओंकारने पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी व व्यायामाचे महत्व समजावून सांगितले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवविचार प्रसार व प्रचार यांची माहिती दिली .
      प्रत्यक्ष ओंकारकडून याबाबत माहिती जाणून घेतली असता तो “दै.पुढारी’’ प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला की ,मी आत्तापर्यंत स्वराज्याची राजधानी असलेल्या शिवतीर्थ रायगडाला २० ते २५ वेळा भेट दिली .पण यावेळी सायकलवरून प्रवास करून भेट देण्याचे ठरवले होते .यामुळे किल्ल्यांची माहिती व पर्यावरण टाळण्यासाठी, शिवविचार व प्रसार आणि प्रसार एवढाच यावेळेला माझा हेतू होता .ज्या ज्या वेळेस मी
        विशेष म्हणजे दरवर्षी ६ जून या शिव राज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी उपस्थित असतात त्यात ओंकार नायगावकर ,प्रा.रवी निंबाळकर ,अभिजित निंबाळकर ,रोहित बागल यांच्यासह उस्मानाबादचे शिवप्रेमी उपस्थित असतात .शोहाला संपल्यानंतर सर्वाना माघारी जायची गडबड असते .पण उस्मानाबादचे हे कार्यकर्ते रायगडावर २ दिवस राहून सर्व कचरा साफ करतात त्यात प्लास्टिक पिशव्या ,पानाच्या रिकाम्या बाटल्या ,प्लास्टिक प्लेटा आदिची विल्हेवाट लावून हे माघारी येतात .या तरुणाच्या ध्येयाने प्रेरित होवून तरुणांनी स्वच्छतेचा मंत्र व निसर्गाचा -हास थांबवावा एवढीच या निमित्ताने अपेक्षा .
शिवतीर्थ रायगडला भेट देतो त्या त्या वेळी मला रायगडाचे नवीन रूप पाहण्यास मिळते .छत्रपती शिवाजी महाराजांना मी देव मनात नाही कारण देव म्हणले की ,मर्यादा आल्या छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते .याची जाणीव माझ्यात आहे आणि ती तरुण पिढीलाही व्हावी ही अपेक्षा या निमित्ताने त्याने व्यक्त केली .
 
Top