उस्मानाबाद - क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार,
    क्रीडा सप्ताहाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.  नगर पालीकाशाळा क्रं. 18 उस्मानाद येथे व्याख्यान, समूहगान, राष्ट्राभक्तीपर गायनाचा कार्यक्रम  आयोजित करण्यात आले असून त्याचे उदघाटन 12 डिसेंबर रोजी, श्रीतळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबद येथे होणार आहे. 13 रोजी पारंपारिक व्यायाम प्रकार खेळाचे प्रदर्शन व लोकनृत्याचा कार्यक्रम,  न. प. शाळा क्र 18 येथे, 14 रोजी भारतीयम कार्यक्रमाचे आयोजन ,  15 रोजी श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे, क्रीडा क्षेत्रातील तज्ञ, नामवंत खेळांडुचे चर्चासत्र, 16 रोजी फुटबॉल क्रीडा स्पर्धा, 17 रोजी हॉकीच्या स्पर्धा, आणि 18 रोजी पोरितोषिक वितरणाचा समारोप श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे  होणार आहे.
    इच्छुक विदयार्थी /विदयार्थींनी व खेळाडूंनी या क्रीडा सप्ताहात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
क्रीडा संस्कृतीची जोपासना व्हावी, युवक व युवती, जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण व्हावा, यासाठी  क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नगरपालीका शाळा क्रमांक 18 शांतीनिकेतन कॉलनी, उस्मानाबादच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद येथे  12 ते 18 डिसेंबर 2014 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले आहे.
 
Top