नागपूर -  विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विधानभवन परिसरात ‘लोकराज्य’ च्या दुर्मिळअंकांचे प्रदर्शनआयोजित करण्यातआलेआहे. यामध्ये 1964 पासूनचे ‘लोकराज्य’ चेअंक ठेवण्यातआलेआहेत. त्यामुळे ‘लोकराज्य’चीआजपर्यंत झालेली जडण-घडण, त्याच्या आशय व मांडणीत होत गेलेल्या बदलांचा इतिहास या प्रदर्शनातून उलगडला गेलाआहे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या विविध विषयांवरील निवडक व दुर्मिळअंकांमुळे माहितीचा खजिनाच खुला झाल्याची प्रतिक्रिया या प्रदर्शनास भेट देणारे मान्यवर व्यक्त करत आहेत.
अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे दिनांक8डिसेंबर रोजी ‘लोकराज्य’च्या दुर्मिळअंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखरओक यांच्या हस्ते करण्यातआले. विधानभवन परिसरात प्रवेश केल्यानंतर ‘लोकराज्य’चे हे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेतआहे. त्यामुळेअधिवेशनाच्या निमित्ताने विधान भवन परिसरातआलेल्या लोकप्रतिनिधींची, वरिष्ठअधिकाऱ्यांची पाऊले आपोआपचया  प्रदर्शनाकडे वळतात. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर अनेकआमदारांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ‘लोकराज्य’चे दुर्मिळ अंक हाताळले आहेत. प्रदर्शनला भेट देणाऱ्यांना ‘लोकराज्य’च्या वेगवेगळ्या विषयांवरील प्रसिद्ध झालेले अंक वाचण्याचा मोह आवरत नाही. बालगंधर्व, छत्रपती शाहू महाराज राज्यारोहण सोहळा, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी, स्वातंत्र्यदिन, विदर्भ विशेष या विशेषांकांसह विविध महापुरुष, भाषा, संस्कृती, स्पर्धा परिक्षा, मुली वाचवा आदी महत्त्वपूर्ण विषयांवरील अंकांचा या प्रदर्शनात समावेशअसून हे अंक पाहिल्यावर प्रदर्शनाला भेट देणारा प्रत्येक जण ‘लोकराज्य’चे कौतुक करताना दिसतात.
प्रदर्शनाच्या ठिकाणी नोव्हेंबर,2014चा ‘लोकराज्य’ अंक विक्रीसाठी ठेवण्यातआलाआहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माहिती वजनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘जयमहाराष्ट्र’ कार्यक्रमासाठी दिलेल्या पहिल्या मुलाखतीचा संपादित भागाचा समावेश असून यात राज्याच्या आगामी ध्येय-धोरणांची दिशा काय असेल, याची माहिती दिली आहे. तसेच याअंकामध्ये मंत्री महोदयांच्या मुलाखतीचा समावेशआहे. या अंकालाही अनेकांची पसंती मिळतआहे
 
Top