उस्मानाबाद -  राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 40 शेळया व 2 बोकड शेळी गट वाटप योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड प्रक्रिया ड्रॉ पध्दतीने 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सधन कुक्कुट प्रकल्प, उस्मानाबाद येथे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन  उपआयुक्त, उस्मानाबाद यांनी दिली आहे.  तरी उस्मानाबाद, तुळजापूर, उमगरा, लोहरा व वाशी या तालुक्यातील लाभार्थ्यांनी या निवड प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त संख्येने हजर रहावे, अधिक माहितीसाठी तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन  उपआयुक्त, उस्मानाबाद यांनी केले. 
 
Top