बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) ऑल इंडिया स्टुडंटस् ङ्गेडरेशन च्या वतिने आयोजित केलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत १८५६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती आयोजक प्रविण मस्तुद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
  सुलाखे हायस्कुल येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी उदय शिंदे
यांच्या हस्ते शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ङ्गजडरशनच्या वतीने मागील ३ वर्षांपासून या स्पर्धा घेण्यात येतात. स्पर्धेच्या युगात गरिब, सामन्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची माहिती व्हावी याकरिता या स्पधेचे आयोजन केल्याचे जिल्हाअध्यक्ष विनायक माळी यांनी यावेळी सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते. प्रजासत्ताक दिनी मान्यवारांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रथमेश व्हनकळस, अशिष सोनटक्के, ओंकार शिंदे, अनिल चौगुले, सिकंदर सय्यद, उमेश मस्तुद, अक्षय शिंदे, सुमित मनगिरे, अझर सय्यद, ऋषिकेश गोरे, अविनाश ननवरे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top