पांगरी (गणेश गोडसे) :- देवासाठी सोडलेल्या कटाळ्याने (बैल) गत अनेक महिन्यांपासून पांगरीसह (ता.बार्शी) परिसरात धुमाकूळ घातला असून शेकडो जांनावरांसह अनेक ग्रामस्थ व शेतकरीही कटाळ्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले असून त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी पांगरी परिसरातील शेतकर्‍यांसह जनतेची मागणी आहे.
    बालाजी देशमुख,भगवान खबाले,विलास गाढवे,वैभव अरुण गाढवे आदि शेतक-यांच्या  बांधलेल्या व मोकळ्या जनावरांवर या कटाळ्याने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.पांगरीत सध्या या कटाळ्याच्या धास्तीने रात्री अपरात्री  फिरणेच ग्रामस्थांनी बंद केले आहे.गाय,बैल,म्हैस,आदि मुक्या प्राण्यांनीही याची भीती घेतली असून हा कटाळ्या दिसताच ते धावाधाव करू लागले असून त्यामुळे अनेकदा बैलगाडी उधळून अनुचित घटना घडू लागल्या आहेत.शेतकर्‍यांना तर एकटे गाठून हा कटाळ्या पळवून पळवून जखमी करू लागला आहे.शेतात जाणारी,शेतातून येणारी,बैलगाडी याबरओबरच ग्रामस्थांनाही उभ्या रस्त्यात अडवून हा कटाळ्या आव्हान देत आहे.अनेक ग्रामस्थांच्या जिवावर हा कटाळ्या उठला आहे.हा कटाळ्या येवढा ऊग्र आहे की त्याने एकदा एखाद्या बैल अथवा इतर प्राण्यास मारले असता त्याची विक्री मातीमोल दरात करावी लागत आहे.त्यामुळे शेतकर्‍यांणा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.पांगरीतील एका शेतकर्‍यांच्या खोंडास मारल्यामुळे त्याची किमत 30 हजारावरून आठशे रुपये झाली.
  जिवाच्या  भितीने या कटाळ्यास कोणीही प्रतिकार करण्यास तयार नसल्यामुळे हा कटाळ्या शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात जावून पिकाची नासधूस करू लागला आहे.तसेच शेतकर्‍यांणी हकलण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावर धाऊन येत आहे.तरी संबंधितांनी याकडे लक्ष केंद्रीत करून या कटाळ्याचा बंदोबस्त करावा अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.
 
Top