उस्मानाबाद - भारतीय सैन्यदल,नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एस एस बी  प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आले आहे. सदरच्या प्रशिक्षण वर्गात सैन्य दलातील तज्ञ अधिका-याकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कंबाईन्ड डीफेन्स सर्व्हीसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीव्दारे सैन्यदलात अधिकारी होवू इच्छिणा-या  तसेच महाराष्ट्रीय नवयुवक-युवतींना सशस्त्र सैन्य दलाकडून एस एस बी परीक्षेचे मुलाखत पत्र मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवाराना सर्व्हीसेस सीलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, परीसर नाशिक रोड नाशिक येथे दि. 10 ते 19 मार्च या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 
इच्छुक युवक-यूवतीं पात्र उदेवारांनी प्रवेशासाठी  5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे खालील प्रमाणे पात्रता धारक करीत असलेल्या उमदेवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतीसह मुलाखतीस हजर रहावे. अधिक माहीतीसाठी  नाशिक येथील कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 0253-2451031  व 2451032 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात मोफत विनामुल्य निवास व भोजणाची सोय करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा  सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी केले आहे.एस एस बी प्रवेश वर्गासाठी खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक असून व हया संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेवून येणे आवश्यक आहे.
कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामीनेशन युपीपएससी अथवा नॅशनल डिफेन्स ॲकडमी एक्झामीनेशन युपीएस पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्शन ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन सी सी सी प्रमाणपत्र अ/ बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेली असावी व एन सी सी ग्रुप हेडक्वॉटर्रने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएटसाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, युनीर्व्हसीटी एन्ट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एस एस बी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असणे आवश्यक असल्याचे पत्रकात नमुद केले आहे.

 
Top