नळदुर्ग  -: येथील  वैद्य यांच्‍या घराण्‍यातील नवसाला पावणारी प्राचीन श्रीदेवी मातेची उपासना मोठया भक्‍तीभावने  सुरु करण्‍यात आली असून वैद्य घराण्‍यातील सेवा करण्‍याची ही चौथी पिढी आहे. या देवीची स्‍थापना करण्‍यात आलेला मुख्‍य दिवस चैत्र शुक्‍ल अष्‍टमी हा आहे. परंपरेनुसार यावर्षीही शुक्रवार दि. 27 मार्च रोजी देवीचा स्‍थापना दिन म्‍हणून तेलतुरीने साजरा करण्‍यात येतो. या तेलतुरीस नैवेद्य ज्‍वारीचा खिचडा, तुरीची ऊसळ, हिरव्‍या आंब्‍याची चटणी, भाजी वरण,साधी पोळी व शुध्‍द गोड तेल तुप म्‍हणुन वापरले जाते. तसेच तांबुलचा नैवेद्य दाखविला जातो. या तेलतुरीस गावातील जवळपास एक हजार भावीक भक्‍तांना वैद्य घराण्‍याच्‍यावतीने भोजन दिले जाते. या दिवशी संध्‍याकाळी आराधी मंडळाच्‍या गाण्‍याचा ही कार्यक्रम होतो.तसेच दरवर्षी नवरात्र महोत्‍सव विविध कार्यक्रमाने साजरा होतो. या देवी महोत्‍सवचा भक्‍तांनी प्रसादाचा लाभ घ्‍यावा असे अवाहन राजेंद्र ऊर्फ विकास वैद्य यांनी केले आहे. 

 
Top