उस्‍मानाबाद -  अ.भा. ब्राह्मण सर्वशाखीय पुरोहीत महासंघाच्या वतीने उद्या रविवार दिनांक २९ मार्च २०१५ रोजी दुपारी चार वाजता पुरोहीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 
    उस्‍मानाबाद  शहरातील देशपांडे स्टँड जवळील अनंतदास स्मारक मंदिरात सदरची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीस अ. भा. ब्राह्मण महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी व अ. भा. सर्वशाखीय पुरोहीत महासभेचे अध्यक्ष वेदमुर्ती महेशजी पाठक यांच्या आदेशान्वये महाराष्ट्राचे संघटक माणिकराव सेलूकर हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व परोहीत बांधवानी स्वतःच्या दोन फोटोसह या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटक गजानन घुगीकर यांनी केले आहे.

 
Top