उस्‍मानाबाद- येथील जिल्‍हा कार्यक्षेत्र असलेल्‍या राजर्षी शाहू महाराज बहूजन मा.व. शिक्षक सह. पतसंस्‍थेची पंचवार्षीक निवडणूक नूकतेच संपन्‍न झाले. पतसंस्‍थेच्‍या 359 मतदारांपैकी 335 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. मतदान शांततेमधून संपन्‍न होऊन लगेच मतमोजनी करण्‍यात आली. या निवडनुकी मध्‍ये संस्‍थेचे 
संस्‍थापक बाळासाहेब वाघमारे यांच्‍या नेतृत्‍वाखालील राजर्षी शाहू महाराज शिक्षक सहकार पॅनलचे सर्वच्‍या सर्व उमेदवार जवळपास 180 च्‍या मताधिक्‍याने विजयी झाले. 
विजयी उमेदवार व त्‍यांना मिळालेली मते आदटराव नवनाथ तात्‍याबा (मत 261), धावरे मिलींद केरबा (मत 253), डोके संतोष गोविंद (मत 244), पडवळ हणमंत बाबूराव (मत 246), पाटील दत्‍तात्रय रावण (मत 247), वाघमारे बाळासाहेब विठ्ठल (मत 244), कराड सुनिता नानासाहेब (मत 251), वाघमारे शिला रामचंद्र (मत 238), भालेराव सुरेश त्रिंबक (मत 219), चौरे पांडूरंग कृष्‍णात (मत 258), तोडकरी नंदकुमार धुळाप्‍पा (बिनविरोध निवड) विजयी उमेदवारांचे लालासाहेब मगर, बापू बेताळे, बशिर तांबोळे, विक्रम पाटील, बिभिषण पाटील, अरूण पाटील, अविनाश मोकाशे, शिवाजी साखरे, बसलिंग चिवटे, महेंद्र रणदिवे, जयपाल जोशी, एन.एस चौरे, राजेंद्र चव्‍हाण, भास्‍कर मस्‍के, विनोद चेडे, दत्‍तात्रय मोहिते, कैलास मोहिते, रमेश बारसकर, आदिंनी आभिनंदन केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्‍हणून नायब तहसिलदार एस.एस. रामदासी यांनी काम केले. 

 
Top