उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य उदयोजकता विकास केंद्र,उस्मानाबादच्यावतीने  सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतीसाठी  उस्मानाबाद येथे  दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालन  या विषयाचे प्रशिक्षण 9 मार्च ते 20 मार्च, 2015 या कालावधीचे  आयोजन  करण्यात आले होते. 
        या प्रशिक्षणात संपूर्ण दुग्ध व्यवसायाचे महत्व, गायीच्या जाती, चाऱ्यांचे नियोजन, लसीकरण, दुधाचे पॅकींग, दुधविक्री तसेच शेळी पालन, उस्मानाबाद शेळीचे महत्व, करडयाची निगा, आहार व आजाराविषयी माहिती ,अर्ध बंदिस्‍त व बंदीस्त शेडची, शेळ्यांच्या वेगवेगळया जातीची  माहिती व कुक्कुट पालनामध्ये गावरान व बॉयलची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय खादयाची व शेडची माहिती, विमा आदि व उदयोजकीय अभ्यासक्रमाविषयी दररोज तज्ञ डॉ. व्यक्तीचे मार्गदर्शन व यशस्वी उदयोजकांचे मार्गदशन यावेळी  करण्यात येणार आहेत.  तसेच उदयोजकीय  संभाषण कौशल्य, व्यक्मत्व विकास, प्रकल्प अहवाल, बँकिग अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन कर्ज प्रस्ताव ,अहील्यादेवी होळकर महामंडळ, नाबार्ड आदि विषयी माहिती  देण्यात येणार आहे. इच्छुक युवक- युवतींनी अधिक अर्जासाठी व माहितीसाठी  कार्यक्रम समन्वयक किशोर कांबळे मो. नं. 9881558846 यांच्याशी संपर्क साधावा, महाराष्ट्र राज्य उदयोजकता विकास केंद्र व्दारा  जिल्हा उदयोग केंद्र, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन  कनिष्ठ  प्रकल्प अधिकारी पांडुरंग कांबळे यांनी केले आहे.    

 
Top