उस्मानाबाद -  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत लोहारा तालुकास्तरीय समिती  गठीत करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य सचिव अभिषेक त्रिमुखे यांनी  कळविले आहे.
            लोहारा तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसिलदार श्रीमती ज्योती चव्हाण, सदस्य पंचायत समितीचे सभापती आसीफ मुल्ला, तालुक्यातील जिल्हा परीषद सदस्य सौ. मीरा माळी, गट विकास अधिकारी सुरेश शिवंदे, सहायक सरकारी वकील संतोष वैद्य, तालुक्यातील  पोलीस ठाण्याचे प्रमुख एस. बी. गायकवाड, तालुका निरीक्षक भूमी अभिलेखचे सौ. एस. एम. तोळमारे, नगर भुमापण अधिकारी  टी. एम. घोसले यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी महादेव धारुळे, भगवान मक्तेदार व अविनाश माळी, पत्रकार यांचे प्रतिनिधी निळकंठ कांबळे, तानाजी माटे तर मोफत कायदेविषयक सल्ला समितीचे पॅनेलवरील एक वकील अॅड के. डी. मोरे यांचीही सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. 

 
Top