उस्मानाबाद -  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत परंडा तालुकास्तरीय समिती  गठीत करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य सचिव अभिषेक त्रिमुखे यांनी  कळविले आहे.
          परंडा तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसिलदार एस. व्ही. कंकाळ, सदस्य पंचायत समितीचे सभापती सौ. काशिबाई इथापे, तालुक्यातील जिल्हा परीषद सदस्य दत्ता साळुंखे, गट विकास अधिकारी एन. आर. जाधव, सहायक सरकारी वकील अॅड यु. एन. भोळे, तालुक्यातील  पोलीस ठाण्याचे प्रमुख एच. बी. वाकडे, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख आर. आर. तळपे,, नगर भूमापण अधिकारी आर. आर. तळपे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी श्रीकृष्ण ऐतवाडे, पत्रकार यांचे प्रतिनिधी आनंद  खर्डेकर, प्रमोद वेदपाठक तर  मोफत कायदेविषयक सल्ला समिती पॅनेलवरील एक वकील अॅड एस. एस. सुर्यंवशी यांचीही सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे

 
Top