पिंपरी - आयुर्वेदाने दिनचर्या व ऋतू चर्या या अनुसार आपण जर आपली जीवन शैली ठेवली तर योग्य संतुलीत आहार घेतला तर आपणास व्याधी होणार नाही हि आयुर्वेदाची मूळ संकल्पना असून आपण निरोगी राहण्यासंदर्भात आयुर्वेद उपदेश करत असतो तसेच  आजारी पडल्यानंतर काय करावं यापेक्षा आजारी पडू नये हि आयुर्वेदाची मूळ भूमिका आहे असे मत जेष्ठ वैद्य रा.ब. गोगटे यांनी व्यक्त केले.
   आयुर्वेदीय औषध विक्रेता संघाच्या आरोग्यप्रभा परिवारातर्फे  “लोककल्याणकारी आयुर्वेद” या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी  चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गोगटे बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन .गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं.
वैद्य प्रशांत सुरू,वैद्य अशोक वाली, वैद्य समीर जोंधळे,वैद्य वंदना मुळे,वैद्य सुप्रशांत सरदेशमुख,आयुर्वेदिय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष सोपान कामठे , गिरीश गांधी, उपाध्यक्ष किरण सूर्यवंशी, सचिव प्रशांत गोलांडे, खजिनदार विद्या दंडवते, अरुण डोंगरे, गणेश थरकुडे, योगेंद्र खळदकर, डॉ. लक्ष्मीकांत गोळे, स्वप्निल गांधी, समीर जोंधळे, विशाल थरकुडे आदी यावेळी उपस्थित होते. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आहार व आजारविषयक दोन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.याठिकाणी नैसर्गिक मधाची माहिती व उपयोग, नैसर्गिक केशर, देशी गायीचे तूप, पंचगव्य निर्मित औषधी, गोमूत्र इत्यादीचे उपयोग, औषधी वनस्पती, आरोग्य, प्राणिक हिलिंग याबाबत माहितीपूर्ण प्रदर्शन, आयुर्वेदिक औषधी उत्पादनांचे व आयुर्वेद, आरोग्यविषयक पुस्तके यांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
       तसेच रविवारी (दि. २४) सकाळी आठ ते नऊ या वेळेत चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहापर्यंत योग व आयुर्वेद दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत वैद्य रामदास आव्हाड यांचे आरोग्यपूर्ण दिर्घायुषी जीवनासाठी आयुर्वेदिय पंचकर्माची उपयुक्तता व माहिती या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी दोन ते साडेचार या वेळेत वैद्य योगेश जोशी, वैद्य संगीता रानडे व वैद्य सुप्रिया गुगळे हे गर्भसंस्कार मनापासून मनापर्यंत, बीजसंस्कार ते गर्भिणी, बालक परिचर्या व बालकांचे आजार तसेच आरोग्य याबाबत आयुर्वेदीय दृष्टीकोनातून शास्त्रीय माहिती देणार आहेत. सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत वैद्य समीर जोंधळे, शैलेश वैद्य आणि विद्याधर कुंभार हे वैय्यक्तिक जीवनशैली व व्यावसायिक कार्यशैलीमुळे तसेच प्रदूषित वातावरणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांबाबत संवादाद्वारे माहिती देणार आहेत.

 
Top