उस्‍मानाबाद -: स्टुडंट ऑलंपीक असोशिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने उस्‍मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख, जिल्हा क्रिडा अधिकारी अशोक बनसोडे, पत्रकार कमलाकर कुलकर्णी, अनंत आडसूळ असो.चे महासिचव सुनिल शिंदे यांच्या उपस्थित तुळजाभवानी क्रिडा संकुलावर करण्यात आले.
       स्टुडंट ऑलंपीक असोशिएशन ऑफ महाराष्ट्र च्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी क्रिडा संकुलावर ज्युडो, बॉकसिंग, लेदरबॉल क्रिकेट, हॉकी, बेसबॉल, कुस्ती, कबड्डी, रॉक बॉल व जिमनॅक्टीक अशा दहा खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा आज पासून सुरु झाल्या असून आज दुपारी या स्पर्धेचे उद्घाटन उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुलांच्या कुस्त्या, बॉक्सींग, ज्युडो आदी स्पर्धाचा मान्यवरांच्या उपस्थित प्रारंभ करण्यात आला.
        यावेळी असो. चे उपाध्यक्ष शंकर गायकवाड, अभिराम पाटील, स्वप्नील पाटील, प्रविण बागल, शाम पंचमहालकर, स्पर्धेचे पंच सर्वश्री  राठोड सर,  संतोश जमदाडे, विजय केपुगूडे, दिपाली शिंदे, सुमती आढाव यांच्यासह राज्यातून आलेले विविध स्पर्धेतील खेळाडू उपस्थित होते. स्टुडंट ऑलंपीक असोशिएशन ऑफ महाराष्ट्र असो.चे राज्याचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी क्रिडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
Top