उस्मानाबाद -: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्य जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सुशासन दिन साजरा करण्यात आला.
जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा हिवताप कार्यालय, दुय्यम निबंधक, विवाह निबंधक/ विवाह अधिकारी कार्यालय यांच्यावतीने शुक्रवारी सुशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना माहिती अधिकार पुस्तिका, डिसेंबर महिन्याचे लोकराज्य मासिक आणि शासन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या. यावेळी विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणीसाठी आलेल्या नवदांपत्यास या पुस्तिका देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी नवदांपत्य आणि त्यांच्या पालकांना या पुस्तिकांचे वितरण केले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी एन.एन.बोरकर, विवाह निबंधक श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते ही पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयाचे अशोक माळगे, भीमा पडवळ,शशीकांत पवार, अशोक सुरडकर, हिवताप कार्यालयाचे व्ही.बी.कांबळे,एन.एच.गाडे, मिलींद गायकवाड, महादेव होळकर यांच्यासह विवाह नोंदणी कार्यालयाचे मुल्यांकन दुय्यम निबंधक कल्याण कुलकर्णी, राजाभाऊ पवार, एस.बी.मंडलीक, टी.पी.पाटील, सी.पी.जमादार यांची उपस्थिती होती.