तुळजापूर : सावरगाव (ता. तुळजापूर) येथे रविवार दि.२० डिसेंबर रोजी सर्व धर्म सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्यामधे १६ जोडपी विवाहबध्द होणार असल्याची माहिती " मंगल सोहळ्याचे " संयोजक तथा कुलस्वामिनी सुतगिरणीचे माजी संचालक रामेश्वर तोडकरी यांनी दिली .
सामुदायीक विवाह सोहळ्याचे हे ७ वे वर्ष आहे. या सोहळ्यात वधु वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी विद्यमान आमदार मधुकररावजी चव्हाण, शिक्षण महर्षी माजी आमदार सि.ना.आलुरे गुरूजी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, श्री कुलस्वामिनी सूतगिरणीचे चेअरमन सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धिरज पाटील, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील, माजी कृषी सभापती पंडीत जोकार, तुळजापूर पंचायत समितीचे सभापती प्रकाश चव्हाण साहेब, तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती संतोष बोबडे, पंचायत समितीचे उपसभापती विलास डोलारे, सावरगाव ग्रा.पं. चे उपसरपंच आनंद बोबडे, सोलापूरचे खा. शरद बनसोडे, जिल्हा शिवसेना प्रमुख सुधीर आण्णा पाटील, भाऊसाहेब आंधळकर, विद्यार्थी सेना अध्यक्ष श्रीकांत देशमुख आदीजण उपस्थितीत राहणार आहेत.
या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधु वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी आवाहन संयोजक रामेश्वर आबा तोडकरी यांनी केले आहे.