उस्मानाबाद :- जागतिक मुद्रा दिनाचे औचित्य साधून कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे शेतक-यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण शनिवारी करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते या जमीन आरोग्य पत्रिका प्रातिनिधीक स्वरुपात शेतक-यांना वितरित करण्यात आल्या.
कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, कृषी विभाग, आत्मा आणि आरसीएफ, उस्मानाबाद यांच्या वतीने या आरोग्य पत्रिका वितरण आणि रब्बी पीक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, आरसीएफच्या मृद परीक्षण प्रयोग शाळेचे वरिष्ठ प्रबंधक नितीन कांबळे, केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. विलास टाकणखार, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार आदींची उपस्थिती होती.
जमिनीत अन्नद्रव्ये किती प्रमाणात उफलब्ध आहेत आणि जमिनीचे आरोग्य अबाधिकत राखण्यासाठी मृद तपासणी करुन मृदा तपासणीवर आधारित खतांचा संतुलित तसेच परिणामकारक वापर होण्याबाबतचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.