लातूर -: श्री वीरशैव पट्टशाली कोष्टी समाज विकास संस्थेमार्फत केल्या जाणा-या विविध कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील व मराठवाडयातील वीरशैव पट्टशाली कोष्टी समाजातील वधु-वर व पालक यांचा परिचय मेळावा औसा रोडवरील पाटील प्लाझा येथे रविवार, दि. 13 डिसेंबर,2015 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मेळाव्यास उपस्थितीत राहण्याचे आवाहन कोष्टी समाज संस्थेमार्फत करण्यात आले आहे. 
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भिंगार येथील चंद्रकांत हंपे तर प्रमुख पाहूणे म्हणून बार्शीचे डॉ.अविनाश लुकडे, डॉ.सौ.अनुराधा अविनाश लुकडे आणि पुणे येथील सौ.शुभांगी अनुपचंद दुगम यांची उपस्थिती राहणार आहे. 
या मेळाव्याचा मुख्य उद्देश मुला-मुलींचे विवाह जुळविणे, वधु-वरांना एकमेकांना जाणून घेण्याची संधी उपलब्ध करुन देणे,  व त्या अनुषंगीचे प्रश्न सोडविणे हा आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नाममात्र शुल्क संस्थेमार्फत आकारण्यात येत आहे. त्यासाळी विवाहयोग्य मुला-मुलींनी अथवा त्यांच्या पालकांनी  फॉर्म भरुन संस्थेकडे तात्काळ जमा करावेत. तसेच वधु-वर स्थळांची योग्य माहिती संस्थेच्या माध्यमातून, अशा मेळाव्याद्वारे मिळू शकते. यामुळे वेळ व इतर खर्चाची बचत होते. 
तरी मेळाव्यास वधू-वर (विवाह योग्य मुले-मुली) व त्यांचे पालक व इतर समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रमेश मायनाळे, उपाध्यक्ष चंद्रशेखर धमगुंडे, सचिव बाबुराव उडगे, कार्यकारी सदस्य यांच्यासह वीरशैव पट्टशाली कोष्टी समाज विकास संस्था, लातूर यांच्यावतीने करण्यात आले आहे. 
या मेळाव्यात देखील वधू-वर माहिती फॉर्म व नोंदणी शुल्क स्विकारले जातील. फॉर्म सोबत फोटो असणे आवश्यक, मेळाव्यानंतर वधु-वर यादी प्रसिध्द केली जाईल. तसेच ही माहिती ई-मेलद्वारेही पाठविण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. 
अधिक माहितीसाठी रमेश मायनाळे भ्रमणध्वनी क्र. 9422471950 व बाबुराव उटगे भ्रमणध्वनी क्र. 9422658245 या क्रमांकावर संबंधितांनी संपर्क साधावा.          
 
Top