नळदुर्ग
:- भारतीय सैन्य दलातील नायक सुधाकर धेनू पवार (वय 38 वर्षे, रा. शास्त्रीनगर दाळींब,
ता. उमरगा) या जवानाचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील,
दोन मुले, एक मुलगी, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. निधनाची वार्ता समजताच त्यांच्या राहत्या
मुळगावी दाळींब व परिसरावर शोककळा पसरली.
सुधाकर पवार हा भारतीय
सैन्य दलात सेवेत रुज झाला, त्यानंतर तो सिक्कीम राज्यातील गंगटोक येथे कर्तव्य बजावत
असताना गुरुवार दि. 28 जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याचे निधन झाल्याचे
सैन्य अधिका-यांनी कळविले. मात्र त्याचे निधन कशामुळे झाले याची माहिती दिले नाही.
दरम्यान आमच्या प्रतिनिधीने सेवेत असलेल्या ठिकाणी 03592256307 या क्रमांकावर शनिवार
रोजी संपर्क साधले असता सुधाकर पवार यांचे पार्थिव त्याच्या मुळगावी रवाना केल्याचे
सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला. पवार यांच्या नातेवाईकांशी संपर्क होवू शकला
नाही.
फोटो : सुधाकर पवार
Related Posts
- दिवंगत भिमसैनिक सगट यांना नळदुर्ग येथे रिपाइंच्या वतीने श्रध्दांजली19 Aug 2020undefined
वागदरी : एस.के. गायकवाडपुणे येथील भिमाकोरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार असलेले दिवंगत भिमसैनिक सुरेश सगट याना नळदुर्ग ता.तुळजापूर ये...Read more »
- चिवरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार15 Aug 2020undefined
चिवरी, दि. 15 : देश रक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेल्या चिवरी येथील आजी-माजी सैनिकाचे व मयत झालेल्या सै...Read more »
- चिवरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजूंना किराणा किटचे वाटप15 Aug 2020undefined
चिवरी, दि. 15 : कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांची उपासमार होत आहे याचे गांभीर्याने विचार करून ...Read more »
- अणदुर गाव होतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; रविवारी 18 रुग्णांची भर02 Aug 2020undefined
नळदुर्ग :- अणदूर ता. तुळजापूर या ठिकाणी दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून ते चिंताजनक आहे. रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी नव्याने 18 रुग्णां...Read more »
- होर्टी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत वृक्षारोपण22 Jul 2020undefined
जळकोट,दि. २२ : मेघराज किलजे...Read more »