नळदुर्ग : अनैतिक
संबंध असलेल्या प्रेयसीकडून प्रियकराकडे वारंवार पैशाची मागणी होत असल्याच्या
कारणावरुन 35
वर्षीय प्रेयसी महिलेच्या खुनप्रकरणी
अवघ्या सहा तासात पोलिसांनी प्रियकरास अटक करुन गजाआड केले. ही घटना बुधवार रोजी
आठ वाजता नळदुर्ग-तुळजापूर राज्यमार्गावरील चिवरी पाटी येथे घडली होती. दरम्यान,
पोलिसांनी आरोपीस तुळजापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दि. 17 जुलैपर्यंत
पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
बबिता तुकाराम शिंदे (वय 35 वर्ष, रा. नळदुर्ग) असे खुन झालेल्या महिलेचे नाव असून बाबू उर्फ पोमा चव्हाण (वय 40 वर्षे, रा. नागझरी तांडा, हल्ली रा. पुजारी तांडा, ता. तुळजापूर) असे अटक करण्यात
आलेल्या आरोपीचे नाव आहे. बुधवार दि. 11 जुलै रोजी चिवरी पाटीजवळ तुळजापूर मार्गाच्या कडेला खड्ड्यात महिलेचे
मृतदेह आढळल्याने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव मिरकले
यांनी भेट दिली. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले.
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप घुगेही घटनास्थळी पोहोचले. मृतदेह नळदुर्ग येथील बबिता तुकाराम शिंदे या महिलेचा असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तिची ओळख बाबू (बबन) पोमा चव्हाण याच्याशी झाली. दोघांमध्ये अनैतिक संबंधही निर्माण झाल्याचे समजते. त्यांच्यात वादानंतर बुधवार रोजी बाबू चव्हाण महिलेचा घरी आला व तिला दुचाकीवर बसवून घेऊन गेला. रात्री महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बाबू चव्हाण याला गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन महिलेचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले.
याप्रकरणी शिवाजी गोपीनाथ भोसले (वय 70
वर्ष, रा. गंधोरा, ता. तुळजापूर) या मयत महिलेच्या पित्याने फिर्याद दिल्यावरुन
आरोपीविरुध्द नळदुर्ग पोलिसात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक
विठठल वारे हे करीत आहेत.