नळदुर्ग  : येथिल नगरपालिकेच्या वतीने दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत राष्ट्रीय नागरी अभियानांतर्गत महिलांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उदघाटन  नगराध्यक्ष रेखाताई जगदाळे उपनगराध्यक्ष शाहीन मसुलदार यांच्या हस्ते बुधवार दि.११ रोजी करण्यात आले.
     नळदुर्ग  नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गोरगरीब दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असून या योजनांतर्गत फँशन डिझाइनिंग, शिवणकाम ,संगणक प्रशिक्षण, बांधकाम पर्यवेक्षक आदीचे प्रशिक्षण  देण्यात येणार आहे. कार्यक्रमास  सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड, श्रीमती राणुबाई सपकाळ, प्रशिक्षक रेणुका खोबरे, सहाय्यक सुरज कासार यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

 
Top