नळदुर्ग :- जळकोट ता. तुळजापूर येथे एका चाळीस वर्षीय मजुराने राहत्या घरी पत्र्याच्या आडूस कपडयाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
यशवंत काशिनाथ देडे (वय 40 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेबाबत शेषराव शंकर काळे (वय 42 वर्षे, धंदा - मजुरी, रा. जळकोट, ता. तुळजापूर) यानी नळदुर्ग पोलीसात खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक व्ही.के. मुंढे हे करीत आहेत.