नळदुर्ग : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना नळदुर्ग येथे शुक्रवार दि. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता भवानी चौकात मोरया प्रतिष्ठान व विविध पक्षाच्यावतीने आदरांजली अर्पण वाहण्यात आली.
यावेळी भाजपाचे सुशांत भुमकर, पदमाकर घोडके, धिमाजी घुगे शिवसेनेचे कमलाकर चव्हाण, सरदारसिंग ठाकूर, संतोष पुदाले, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक नितीन कासार, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष गणेश मोरडे, नवल जाधव, उमेश नाईक, भैरवनाथ कानडे, संतोष पवार यांच्यासह नागरीक उपस्थित होते.