तुळजापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान (उमेद) अंतर्गत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी बुधवार दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता तुळजापूर येथील पंचायत समितीत तालुकास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त सु्शिक्षित बेरोजगार युवक, युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड, गटविकास अधिकारी बी.आर. ढवळशंख यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यास शासन मान्यता प्राप्त नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून नौकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. येताना आपली वैयक्तीक शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र आदी झेरॉक्स प्रत घेवून मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top