नळदुर्ग :- संविधानाची प्रत जाळणा-या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलणा-या समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्यावतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्याकडे  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रिपाइं उस्मानाबाद जिल्हाच्यावतीने दि. 9 ऑगस्ट रोजी जंतर मंतर येथे समाजकंटकानी भारतीय संविधानाची प्रत जाळली, संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलून घोषणाबाजी केली. या समाजकंटकावर कडक शासन करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइंचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ लोंढे यांनी दिला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष आमर जेटीथोर, राकेश बनसोडे, दिपक कांबळे, विशाल काबंळे, केशव गायकवाड, शहबाज कुरेशी, गणेश बनसोडे, महेश बनसोडे, पप्पू काबंळे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top