तुळजापूर :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर  टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त दि. 1 ऑगस्ट रोजी सावरगाव (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रामेश्वर  तोडकरी, उपसरपंच आनंद  बोबडे यांच्या हस्ते प्रतिमाचे पुजन करून व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
     यावेळी  माजी उपसभापती  विलास  डोलारे, ग्रामसेवक  कोठे, ग्रा.पं. सदस्य  सचिन  मगर, राहुल  डोलारे,  माजी  व्हाईस  चेअरमन  नेताजी कदम, प्रताप  माने, तायाप्पा साठे  शिवाजी  माळी, रमेश  लिंगफोडे, सागर डोलारे, नाना कांबळे आदी  मान्यवर उपस्थित होते.

 
Top