उस्मानाबाद :- राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद आगारातील उस्मानाबाद-लोहारा या बसला गळती लागल्याने प्रवाशांना चक्क बसमध्येच छत्र्याचा आधार घ्यावा लागला.
उस्मानाबाद बसस्थानातून उस्मानाबाद-लोहारा ही बस आज दुपारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास निघाली. या बसने श्री परीट (मो.नं. 9130714398) हा युवक प्रवास करत होता. आज दुपारपासुन सर्वत्र पावसाने कमी अधिक हजेरी लावली. प्रवासादरम्यान पावसामुळे बसच्या छताला गळती लागून पावसाचे पाणी बसमधील आसनवर पडू लागल्याने काही प्रवाशांना चक्क छत्र्याचा आधार घ्यावा लागला. यामुळे प्रवाशांना नाहकच मनस्ताप सहन करावा लागला. राज्य परिवहन महामंडळाने पावसात गळती लागलेल्या एसटी बसची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशी वर्गातुन होत आहे.