तुळजापूर :- सावरगाव ता. तुळजापूर येथे स्वातंत्र्य सेनानी कै. भानुदासराव जयवंतराव धुरगुडे सेवा भावी संस्था मंगरूळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे व राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
   या मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये मोफत चष्मे , मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषधोपचार देण्यात आले. या शिबिरात 270 ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये 102 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे उपस्थित डॉ. यांनी सांगितले  आणि आवश्यक आसलेल्या 160 रुग्णांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. 
   मोफत शिबिराचे आयोजन केल्या बद्दल सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने महेंद्र धुरगुडे यांचा सत्कार करण्यात आला.
    आमोल सरडे , भागवत सरडे , शंकर तात्या शिंदे , हरिश्चंद्र कदम ,परमेश्वर काळदाते रामराजे पाटील ,मारुती डोके , ग्रा. पं. सदस्य श्री. रामदास माळी , बाळासाहेब शिंदे , सिध्देश्वर बंडगर  धर्मराज रुपनर सुधीर मगर ,  आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top