तुळजापूर :- माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहार वाजपेयी यांना शनिवार दि. 18 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथील नगरपरिषदेच्या प्रागंणात सर्व पक्षांच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, राष्ट्रवादीचे युवक तालुाकध्यक्ष आनंद दादा कंदले, मनसेचे अमर परमेश्वर, भाजपाचे तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, आप्पासाहेब पाटील, माधव अण्णा कुतवळ, अमर मगर, गोकुळ शिंदे, कदम एस.के., पंडित जगदाळे, संदीप गंगणे, नागेश नाईक, सुहास साळुंके, शिवाजी बोधले, बाळासाहेब शमराज, इंद्रजित साळुंके, दत्ता राजमाने, बाळासाहेब भोसले, उमेश गवते, यांच्यासह नगर सेवक, प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक उपस्थित होते.