तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये आरक्षण केंद्र कार्यालय सुरू झाले असून लवकरात लवकर सुरळितपणे चालु करण्यात यावे, या मागणीचे दि. १८ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती, तुळजापूर च्या वतीने डाक घर प्रमुख यांना निवेदन देण्यात आले .

निवेदनात असे नमूद केले आहे की, रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून तुळजापूर शहरात येणा-या परराज्यातुन व शहरातील भक्तांच्या सोईसाठी रेल्वे रेझव्हेंशन करण्याची व्यवस्था आपल्या कार्यालयामध्ये केलेली असून, आद्याप रेझव्हेंशन कार्यालय सुरू झालेले आहे. तसे या ना त्या कारणावरुन चार दिवस चालू व चार दिवस बंद असे दिसून आलेले आहेत. तसेच रेल्वे रेझव्हेंशन दर्शविणारा फलक आपल्या कार्यालयात लावण्यात आलेला नाही .दर्शविणारा फलक लावण्यात यावा. तसेच श्री तुळजाभवानी आगामी शारदीय नवरात्र उत्सव चालू होणार असून, तुळजापूर शहरात येणा-या भाविकांची रेल्वे रेझव्हेंशन करण्यासाठी गैरसोय होवू नये. याची गर्भयपुर्वक काळजी घ्यावी. तसेच भाविकांची गैरसोय झाल्यास रेल्वे संघर्ष समिती तुळजापूर यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. या निवेदनावर बबनराव गाडवे, रत्नाकर खोले, रौफ शेख, कोंडीबा प्रताप, विकास तांबे, अशोकराव साळुंके, युवराज मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top