लोहारा : इकबाल मुल्ला
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा,असे प्रतिपादन डॉ.दापके-देशमुख दिग्गज यांनी केले.
सह्याद्री फाऊंडेशन्स व चाईल्ड-लाईन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी (तेरणा नगर) येथे दि. 26 सप्टेंबर रोजी शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र वितरण सोहळा व 1098 या टोल फ्री नंबरची जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग वाकरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री फाऊंडेशन्सचे संसथापक-अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज, पं.स.सदस्य संग्राम देशमुख,उपसरपंच अमोल समुद्रे, क्रुषि.उ.बा.स.चे संचालक निहाल काझी,माजी सभापती दगडु ढवारे,बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम,बाल कल्याण स.चे सदस्य कोळगे, मुख्याध्यापक व्ही.आर.भोरे,समाजसेवक झुंबर बोडके,विलास रसाळ,शिराज मुल्ला,संतोष पांचाळ, दादा कोरके,अदि उपस्थित होते.
यावेळी राज्य शासनाच्या बाल रक्षा अभियानाची सविस्तर माहिती बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.ए.डी. कदम यांनी सांगितली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गजानन पाटील व सुत्रसंचालन एच.डी.कोळपे यांनी केले तर आभार व्ही.आर.भोरे यांनी मानले.या कार्यक्रमास जे.एम. सुरवसे,ए.बी.दळवी,फारुक शेख,अशोक गुरव, आर.बी.मस्के,श्रीमती एच.आर.कांबळे,एस.एम. पाटील,यांच्यासह विद्यार्थी,पत्रकार,संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
