नळदुर्ग : सचिन गायकवाड 

नळदुर्ग येथील कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे दि. २४ सप्‍टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. 

आपल्या देशाचा सामाजिक ,सांस्कृतिक  व शैक्षणिक विकास घङवण्यामध्ये राष्ट्रीय  सेवा योजनेचे महत्त्व दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. प्रभावी व्यक्तीमत्व घडवत असताना सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. विशेषतः तरूणाकङून राष्ट्र सेवा घडावी तसेच युवा शक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा. या हेतुने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबवल्या जातात. असे राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मोहन बाबरे , उद्घाटक प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत आर. के . ढोकळे, एन. एस. शिंदे, एस. एस. राठोड,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top